शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 17:30 IST

तुम्हीही फसविणार नाही ना?

सांगली : महायुतीच्या उमेदवाराविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरताना महाविकास आघाडीतील वाद संपविण्याची गरज आहे. सांगली लोकसभेच्या मैदानात एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या. त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन माजीमंत्री अजितराव घोरपडे यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले.सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत शुक्रवारी सांगलीत आले. यावेळी राऊत यांनी कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी घोरपडे यांच्याकडे पाठिंबा मागितला. या भेटीविषयी अजितराव घोरपडे ‘लोकमत’शी बोलले.

ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल, तर महाविकास आघाडीकडून एकास एक उमेदवार दिला पाहिजे. दोन उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचा हेतू सफल होणार आहे का? महायुतीचा उमेदवाराचा पराभव होणार का, असा सवालही राऊत यांना केला आहे. एकास एक उमेदवार निवडणूक मैदानात उतरविल्यास माझे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील, असे आश्वासनही त्यांना दिले आहे.

तुम्हीही फसविणार नाही ना?राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखून भाजपच्या उमेदवाराला दोन लोकसभा निवडणुकीत मदत केली. पण, त्यानंतर फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्याप्रमाणे संजय राऊत तुम्हीही आम्हाला फसविणार नाही ना, असा सवालही घोरपडे यांनी राऊत भेटीवेळी केला.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाSanjay Rautसंजय राऊतchandrahar patilचंद्रहार पाटील