सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतून लढण्यास प्राधान्य राहील. पण, राष्ट्रवादी अजित पवार गटाला किमान ३० जागा दिल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारी अर्ज भरून घेण्यास आजपासून सुरुवात झाली असून १२ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जगदाळे म्हणाले की, महापालिका निवडणुकीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकत्र लढण्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता पाहूनच जागा वाटप झाले पाहिजे. भाजपा कमकुवत असलेल्या जागी राष्ट्रवादीला उमेदवारी द्यावी. महापालिका निवडणुकीतील गेल्या १५ वर्षांचा इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २००३ मध्ये प्रथमच सत्ता परिवर्तन केले होते. २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने महापालिकेत आघाडी सत्ता आली होती. गत सभागृहात राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक होते. तसेच अडीच वर्षे राष्ट्रवादीचा महापौर होता. याच जोरावर आम्ही भाजपकडे ३० जागांची मागणी करीत आहोत. मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच, सहा, वीस, तीन आणि सातमधून १८ जागा पक्षाला मिळणे अपेक्षित आहे. सांगली शहरातील अकरा आणि कुपवाड शहरातील जागा अशा तीस जागा पक्षाच्या वाट्याला आल्या पाहिजेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून काही माजी नगरसेवक आणि नवीन चेहरे निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जगदाळे म्हणाले,‘जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार रिंगणात होते. नगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल. दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता मात्र जगदाळे यांनी फेटाळून लावली.
Web Summary : NCP Ajit Pawar faction demands 30 seats in Sangli municipal elections. Otherwise, they will contest independently. Faction started accepting candidacy applications; alliance with Sharad Pawar faction unlikely.
Web Summary : सांगली नगर निगम चुनाव में एनसीपी अजित पवार गुट ने 30 सीटों की मांग की है। अन्यथा, वे स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेंगे। गुट ने उम्मीदवारी आवेदन स्वीकार करना शुरू कर दिया है; शरद पवार गुट के साथ गठबंधन की संभावना नहीं है।