शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील विजेचे १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला द्या, जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:27 IST

सांगली : जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त ...

सांगली : जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी जलसंपदा विभागाने शासनाकडे केली आहे. मे महिन्यापर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा पाण्याची जिल्ह्यासाठी गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.कोयना धरणामधीलपाणीसाठा, एकूण वार्षिक पाणीवापराचे नियोजन, अपेक्षित तूट, सिंचन व वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी वजा जाता सध्या ७० टीएमसी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध आहे. त्यातील पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ३५ टीएमसी व पूर्वेकडील सिंचन/बिगर सिंचनासाठी ३५ टीएमसी पाणीवापर अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यासाठी चालू वर्षामध्ये उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये असणारी तूट, पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये झालेली वाढ झाली आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती पाहता १२ टीएमसी पाणी हे कोयनेतून अतिरिक्त उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोयनेमध्ये वीजनिर्मितीसाठी ठेवलेल्या ३५ टीएमसी पाण्यामधून हे १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचा ठराव दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या कालवा समितीच्या बैठकीत घेतला होता. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे कोयना धरणातून जादा पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सांगलीच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी, दि. २५ जानेवारीला १२ टीएमसीच्या जादा पाणी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली.

वीजबिलासाठी २१ कोटीटेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून २०२३-२४ मधील खरीप हंगामात टंचाईअंतर्गत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रलंबित २१ कोटी रुपयांच्या वीज देयकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. हा निधी मिळाला नाही तर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी