शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Sangli: लग्न लावून न दिल्याने प्रेयसीच्या आईला मारहाण, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 16:41 IST

सांगली : ‘मी तुझ्या मुलीबरोबर लग्न करणार होतो. माझे तिच्यावर प्रेम होते. तू तिचे दुसरीकडे लग्न का लावून दिलेस’ ...

सांगली : ‘मी तुझ्या मुलीबरोबर लग्न करणार होतो. माझे तिच्यावर प्रेम होते. तू तिचे दुसरीकडे लग्न का लावून दिलेस’ म्हणून प्रेयसीच्या आईला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार तुंग (ता. मिरज) येथे घडला. याप्रकरणी गणेश पाटील व शरद अशोक पाटील (रा. तुंग) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुंग (ता. मिरज) येथील सरिता विलास जाधव (वय ४९, वसंतनगर) यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या मुलीवर प्रेम करणारा गणेश पाटील व साथीदार शरद पाटील हे दोघे जण रात्री आठच्या सुमारास जाधव यांच्या घरी आले. सरिता आणि त्यांच्या सासू सोनाबाई या दोघी जणी घरी होत्या. गणेश याने सरिता यांना उद्देशून ‘तुम्ही मुलीचे दुसरीकडे लग्न का लावून दिले’ म्हणून वाद घातला. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश याने शिवीगाळ करून हातातील काठीने त्यांच्या कंबरेवर, हातावर मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सरिता यांच्या सासू सोनाबाई या सोडवण्यास आल्या असताना त्यांनाही काठीने मारले. त्यांच्या हातातील बांगड्या फोडून दुखापत केली. मारहाणीनंतर गणेश व शरद या दोघांनी दोघींना शिवीगाळ करून जाताना सरिता यांचा मुलगा ‘अक्षय याला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली.या प्रकारानंतर सरिता यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार घरात घुसून मारहाण, शिवीगाळ, दमदाटीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस