शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli News: पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग, रेल्वे तिकीट तपासनिसाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:04 IST

प्रवासी दाम्पत्यास केली बेदम मारहाण

मिरज : परळी-मिरज पॅसेंजर रेल्वेत मुलीला खेटून बसण्यास विरोध केल्याने तिकीट तपासनिसाने प्रवासी दाम्पत्यास बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रवीण सुखदेव घाडगे (वय ३२, नेमणूक मिरज, रा. घाडगे वस्ती, मु. पो. टाकळी, ता. माढा) या रेल्वे तिकीट तपासनिसाविरुद्ध मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार पत्नी व मुलीसोबत नातेवाइकाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी सांगोला येथे गेले होते. रविवार, दि. २५ रोजी इचलकरंजीस परतण्यासाठी ते सांगोला स्थानकात परळी-मिरज पॅसेंजर गाडीच्या जनरल बोगीत बसले. कवठेमहांकाळ ते सलगरेदरम्यान प्रवीण घाडगे हा तिकीट तपासनीस त्यांच्याजवळ येऊन ‘मी रेल्वे कर्मचारी आहे मला जागा द्या’, असे म्हणत त्यांच्या १९ वर्षाच्या मुलीजवळ बसला. यावेळी मुलीच्या वडिलांनी घाडगे यास ‘तुमची बॅग खाली ठेवा व नीट बसा’ असे सांगितल्याने, ‘मी बॅग काढत नाही, मी नीट बसत नाही, तुला काय करायचे आहे ते कर.’ असे म्हणत घाडगे मुलीच्या बाजूस खेटून बसला. मुलगी घाबरल्याने मुलीच्या वडिलांनी घाडगेस बाजूला जाऊन बसण्यास सांगितले. यावर चिडलेल्या घाडगेने मुलीच्या वडिलांच्या पोटात लाथ मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलीच्या आईने अडविण्याच्या प्रयत्न केल्याने तिलाही मारहाण करून ढकलून दिले. यावेळी तिचा चष्मा तुटला. यावेळी सोबतच्या रेल्वे प्रवाशांनी घाडगे याला रोखले. सायंकाळी मिरज रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवीण घाडगे या तिकीट तपासनिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने खळबळ उडाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी