शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कॅफेमध्ये युवतीवर अत्याचार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली कॅफेची तोडफोड

By घनशाम नवाथे | Updated: May 17, 2024 12:54 IST

पोलिसांच्या हप्तेखोरीने कॅफेत लैंगिक चाळ्यांना ऊत आल्याचा आरोप

सांगली : सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभरफुटी रस्त्यावरील हॅंग आॅफ कॅफेवर हल्लाबोल केला. आतील सर्व केबिनची व साहित्याची तोडफोड केली. बाहेरील फलकही दगडफेक करुन फोडला.अधिक माहिती अशी, शंभरफुटी रस्त्यावरील हँग ऑफ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन युवतीशी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.दरम्यानशिवप्रतिष्ठानयुवा हिंदुस्थान संघटनेने दोन वर्षापूर्वी सांगलीतील कॅफेमध्ये लैंगिक चाळे सुरु असल्याची तक्रार करत सर्व कॅफे बंद करण्याचा इशारा दिला होता. थोडे दिवस प्रकार शांत राहिला. त्यानंतर राजरोसपणे कॅफेमध्ये लैंगिक चाळे करण्यासाठी मूभा दिली जात आहे. सहा महिन्यात याबाबत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हॅंग आॅफ कॅफेवर हल्लाबोल केला. कॅफेतील केबिनची तोडफोड केली. आतील फर्निचर, खुर्च्यांची तोडफोड केली. फलकावरदगडफेक करुन तो फाडला. जोरदार घोषणाबाजी केली. विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळघटनास्थळी धाव घेतली.संघटनेचे रणजीत चव्हाण म्हणाले, सांगलीतील अनेक कॅफे मिनी लाॅज बनले आहेत येथे लैंगिक चाळ्यासाठी केबिन दिल्या जातात. हे कॅफे बंद करण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. परंतू पोलिस हप्ते घेऊन कारवाई करत नाहीत. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरु राहिल्यास तोडफोड करावी लागेल.दिगंबर साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे शेकडो कॅफे सुरु आहेत. तेथे आम्हाला आंदोलन करावे लागेल. सांगलीतील या प्रकरणात कॅफे मालकावर गुन्हा दाखल करुन सहआरोपी करावे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस