जायंटस् ग्रुपने स्त्रीशक्तीचा सन्मान केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST2021-03-10T04:26:49+5:302021-03-10T04:26:49+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपरिषदेमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने खऱ्या अर्थाने ...

The Giants Group honored femininity | जायंटस् ग्रुपने स्त्रीशक्तीचा सन्मान केला

जायंटस् ग्रुपने स्त्रीशक्तीचा सन्मान केला

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपरिषदेमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून जायंट‌्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा सन्मान केला आहे, असे गौरवोद्गार मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी काढले.

जायंट्सच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दंतचिकित्सा, रक्ततपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांची दंततपासणी, रक्तामधील हिमोग्लोबिनची तपासणी व सर्वसाधारण तपासणी करून लगेच औषधे देण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण ४७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, युनिट डायरेक्टर राजकुमार ओसवाल, डॉ. सचिन शिंदे, सचिन घबक, जायंटस‌्चे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अ‍ॅड. श्रीकांत पाटील, गजानन परब, भूषण शहा, नितीन शहा, दत्तात्रय माने, डॉ. विजयकुमार वडेर, स्वरूप मोरे, उदय देसाई, महेश ओसवाल, नितीन फल्ले, प्रवीण फल्ले उपस्थित होते.

Web Title: The Giants Group honored femininity