घाटनांद्रे-कवठेमहांकाळ रस्त्यावर अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST2020-12-07T04:20:21+5:302020-12-07T04:20:21+5:30
दिलीप शिंदे हे आपल्या दुचाकीवरुन (क्र. एमएच १० एएच ५८८९) शनिवारी सायंकाळी कवठेमहांकाळकडून गावी घाटनांद्रेकडे येत होते. सायंकाळी साडेसहा ...

घाटनांद्रे-कवठेमहांकाळ रस्त्यावर अपघातात तरुण ठार
दिलीप शिंदे हे आपल्या दुचाकीवरुन (क्र. एमएच १० एएच ५८८९) शनिवारी सायंकाळी कवठेमहांकाळकडून गावी घाटनांद्रेकडे येत होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते गर्जेवाडी फाट्यानजीक मिनी पुलावर आले असता, घाटनांद्रेकडून कवठेमहांकाळकडे म्हैस घेऊन जाणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच ०५ बी. एच. ६२९९) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दिलीप शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले.
याबाबत शिंदे यांचे चुलत बंधू सचिन रावसाहेब शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलिसात माहिती दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप करे करीत आहेत.
दिलीप शिंदे यांच्या लहान बहिणीचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. आता अपघातात मुलगाही गेल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंबच खचले आहे. दोन्ही मुले गमावल्याने आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शिंदे यांची परिस्थिती खूपच हलाकीची आहे.
फोटो-०६दिलीप शिंदे