मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाव
By Admin | Updated: February 12, 2015 00:34 IST2015-02-11T22:40:00+5:302015-02-12T00:34:42+5:30
उद्योगमंत्र्यांकडे मागणी : समितीकडून आंदोलनाचा इशारो

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाव
कुपवाड : राज्य शासनाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत अनुकूलता दाखवून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच आरक्षण द्यावे, अशी मागणी मुस्लिम आरक्षण कृती समितीच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली.
मुस्लिम आरक्षण कृती समितीचे जावेद पटेल, मुस्तफा बुजरूक यांच्या नेतृत्वाखाली आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ६८ वर्षे झाली. अजूनही मुस्लिम समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. सच्चर समितीने आरक्षण देण्याची शिफारस केली; परंतु राज्य शासनाने हे आरक्षण रद्द केले. शिवसेनेने सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालण्याचे काम केले आहे. उच्च न्यायायलयानेही मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. आरक्षणामुळे शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सकारात्मक निर्णय जाहीर करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली.
यावेळी शाहीद सतारमेकर, आशपाक मोमीन, समीर कुपवाडे, यासीन मुल्ला, मौलाना बेपारी, इमाम तांबोळी उपस्थित होते. (वार्ताहर)