निराधार योजनेतून न्याय मिळवुन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST2020-12-24T04:24:25+5:302020-12-24T04:24:25+5:30

शिराळा : संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या नूतन अध्यक्ष व सदस्यांनी गरजू निराधारांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे ...

Get justice from baseless schemes | निराधार योजनेतून न्याय मिळवुन द्या

निराधार योजनेतून न्याय मिळवुन द्या

शिराळा : संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या नूतन अध्यक्ष व सदस्यांनी गरजू निराधारांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना नूतन कमिटीची घोषणा व अध्यक्ष, सदस्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी आरोशी सिंग, तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते.

तहसीलदार शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष म्हणून संपतराव शिंदे व सदस्य म्हणून सुनील तांदळे, संदीप तडाखे, निलोफर डांगे, संभाजी उपलाने, आनंद पाटील यांची निवड केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो-२३शिराळा१

फोटो ओळी : शिराळा येथे संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या नूतन अध्यक्ष व सदस्यांच्या सत्कारप्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक, आरोशी सिंग, गणेश शिंदे, विजयराव नलवडे, विश्वासराव पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Get justice from baseless schemes