शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

ऊठ शेतकरी राजा, जागा हो, उचल तुझी तलवार!

By admin | Updated: December 23, 2014 23:51 IST

हौसाताई पाटील यांची हाक : कडेगावात धरणे आंदोलन

कडेगाव : ‘उठ शेतकरी राजा उचल तुझी एकजुटीची तलवार, अन्यायाचा कहर झाला, गप्प किती बसणार...’ अशी हाक क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊस दराच्या लढ्यासाठी दिली. तलवार उचलल्याशिवाय हे सरकार नमणार नाही, ही तलवार उठल्यावर सरकारचे काही खरे नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी सरकारला दिला.शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे प्रतिटन पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी कडेगाव येथे आज तालुक्यातील शेतकरी व शेतकरी कामगार पक्ष यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील बोलत होत्या. यावेळी शेकाप तालुका सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.त्या पुढे म्हणाल्या, आता शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे प्रति टन पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात मोर्चा नेणार आहे. कारखान्यांनी प्रति टन १९00 रुपये उचल जाहीर केली आहे. ही उचल अन्यायकारक असून ती शेतकऱ्यांना मान्य नाही. शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यापासून कारखान्यांनी १४ दिवसांच्या आत एफआरपीप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. परंतु सरकार हा कायदा अंमलात आणत नाही. सरकारचे कान धरण्याची वेळ आली असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी परशुराम माळी, संदीप महाडिक, इंद्रजित पाटील, दमयंती पाटील, जगन्नाथ मोरे, पोपट म्हस्के, सतीश मोरे, अ‍ॅड. शौर्या पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)बारा धान्यांचे धपाटेभाजप सरकार हे १२ धान्यांचे धपाटे झाले. पण हे धपाटे आता पचेनासे झाले आहे. त्यांनी आता शेतकऱ्यांचेच धपाटे करायचे ठरवले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या कानात घुसेनात, म्हणून आता सरकारचे कान धरले पाहिजेत. म्हणूनच आता शेतकऱ्यांना लढ्यासाठी प्रवृत्त करणार आहे.