शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गॅस्ट्रो साथीमुळे मिरजेत एकच बळी?

By admin | Updated: December 19, 2014 00:18 IST

६८२ रुग्णांवर उपचार : महापालिका प्रशासनाची शासनाला माहिती

मिरज : गॅस्ट्रो साथीने मिरजेत सुमारे १४ जणांचा बळी गेला; मात्र महापालिका प्रशासनाने आनंदा पारिसा कांबळे (रा. समतानगर) या एकाच रुग्णाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. गॅस्ट्रोच्या ६८२ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने शासनाला दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचा बळी गेला. दूषित पाण्याने हजारो नागरिकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी विधानसभा अधिवेशनात मिरजेतील गॅस्ट्रो साथीत किती बळी गेले व महापालिकेने काय उपाययोजना केल्या? हा प्रश्न उपस्थित केला आहे. विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्याने नगरविकास विभागाने महापालिकेकडून माहिती मागितली आहे. महापालिका आरोग्य विभागाने ‘कॉलऱ्या’ची लागण झाल्याने मिरजेत आनंदा कांबळे यांचा एकच बळी गेला व ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मिरजेत एकूण ६८२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. गॅस्ट्रोची साथ रोखण्यासाठी शहरात रुग्णांचे सर्वेक्षण करून उपचार करण्यात आले. मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले. जुन्या जलवाहिन्या धुऊन काढण्यात आल्या. जुन्या जलवाहिन्यांव्दारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ३१० ठिकाणी जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली. पाणी अशुध्द आढळलेल्या ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती करून पाणी उकळून, गाळून पिण्याबाबत जनजागृती व प्रबोधन केल्याची माहिती देऊन अद्याप रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, साथ आटोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभेत माहिती देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यास नागपूरला पाठविण्यात आले नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फौजदारीची २९ ला सुनावणीशहर सुधार समितीने गॅस्ट्रोप्रकरणी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्यावर दाखल केलेल्या फौजदारी खटल्याची सुनावणी २९ डिसेंबर रोजी मिरज न्यायालयात होणार आहे. महापालिकेने म्हणणे सादर केले नसल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे. म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याची पाठवलेली नोटीस मिरज शहर पोलिसांऐवजी चुकून सांगली शहर पोलिसांकडे गेल्याने अद्याप महापालिकेला नोटीस बजाविण्यात आलेली नाही, असे शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितले. आता पुन्हा नव्याने महापालिका आयुक्तांना नोटीस काढून शहर सुधार समितीचे पदाधिकारी स्वहस्ते पोलिसांकडे देणार आहेत.