शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, गावभाग परिसर हादरला; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:09 IST

अपार्टमेंटच्या काचा फुटल्या, नागरिक धावले

सांगली : गावभागातील बावडेकर वाड्याजवळील परिसर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरला. एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामुळे शेजारील आठ ते दहा अपार्टमेंटमधील खिडक्यांच्या काचा फुटून चक्काचूर झाला. तर मोटारींच्या काचांना तडे गेले. स्फोटाच्या आवाजाने अनेकजण घाबरून रस्त्यावर धावले. स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही.गावभाग परिसरात बावडेकर वाड्याजवळ स्वकुल अपार्टमेंट आहे. पाठीमागील अपार्टमेंटमध्ये केटरिंगचा व्यवसाय करणारे राजेंद्र गोडसे हे पत्नी व मुलासह राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये केटरिंगसाठी लागणारी भांडी, ताटे, गॅस सिलिंडर असे साहित्य असते. रविवारी सकाळी गोडसे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यांचा फ्लॅट बंद होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक त्यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.

स्फोटाच्या आवाजानंतर आजूबाजूच्या आठ ते दहा फ्लॅटच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. आवाज कशाचा आणि काय घडले? हे कोणालाच कळेना. त्यामुळे रविवारची सुटी असल्यामुळे घरात असलेले नागरिक, महिला, तरुण पटापट बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले. आसपासचा अर्धा किलोमीटरचा परिसर स्फोटाच्या आवाजाने हादरला होता. काही वेळातच गोडसे यांच्या फ्लॅटमधून स्फोट झाल्याचे समजले. त्यांच्या फ्लॅटमधील भांडीकुंडी विखुरली गेली होती. फ्लॅटचा बाहेरील दरवाजा, आतील दरवाजा मोडून पडला होता. दोन्ही बाजूच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रील उडून फेकले गेले. दोन पाण्याच्या टाक्याही फुटल्या. प्लास्टिकची ताटे उडून गेली होती. शेजारील अपार्टमेंटच्या खिडक्यांच्या काचा फुटून सर्वत्र खच पडला होता.शेजारील अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेल्या दोन मोटारींच्या काचांना तडे गेले. गोडसेंच्या फ्लॅट शेजारीच राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेच्या घरातील काचाही फुटल्या होत्या. स्फोटाची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह महापालिका अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते.

मोठा अनर्थ टळलाराजेंद्र गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये चार सिलिंडर होते. त्यापैकी दोन सिलिंडर भरलेले होते. तिसरा रिकामा अन् चौथा अर्धा होता. एका सिलिंडरचा स्फोट झाला. गोडसे कुटुंब बाहेर गेल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तसेच अन्य सिलिंडर सुरक्षित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

स्फोटाच्या कारणांचा तपासगोडसे यांच्या फ्लॅटमधील एक सिलिंडर गॅस गिझरला जोडला होता. या सिलिंडरमधून गॅस गळती होत फ्लॅटमध्ये गॅस पसरला असावा. दारे, खिडक्या बंद असल्याने दाब वाढून स्फोटाची घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. गॅस कंपनीचे अधिकारी याचा तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडरfireआग