कुपवाडमधील गॅस शवदाहिनी ऑपरेटरविना पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:42+5:302021-09-19T04:26:42+5:30

कुपवाड : शहरामधील बुधगाव रस्त्यावरील स्मशानभूमीमध्ये महापालिकेच्यावतीने बसविण्यात आलेली गॅसदाहिनी गेल्या महिन्याभरापासून ऑपरेटरविना पुुन्हा बंद पडली आहे. याप्रकरणी ...

Gas crematorium in Kupwad closed again without operator | कुपवाडमधील गॅस शवदाहिनी ऑपरेटरविना पुन्हा बंद

कुपवाडमधील गॅस शवदाहिनी ऑपरेटरविना पुन्हा बंद

कुपवाड : शहरामधील बुधगाव रस्त्यावरील स्मशानभूमीमध्ये महापालिकेच्यावतीने बसविण्यात आलेली गॅसदाहिनी गेल्या महिन्याभरापासून ऑपरेटरविना पुुन्हा बंद पडली आहे. याप्रकरणी नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने त्वरित ही बंद असलेली गॅसदाहिनी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

शहरासह परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने गॅस दाहिनी बसविली होती. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चाचणी घेण्यात आली होती. तत्कालीन महापौर गीता सुतार यांच्याहस्ते या गॅस दाहिनीचे लोकार्पण करण्यात आले होते. शहरातील बुधगाव रस्त्यावर यल्लमा मंदिराच्या पिछाडीस ही स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम झाले आहे. दाट लोकवस्तीमध्ये असणाऱ्या या स्मशानभूमीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ही गॅस दाहिनी मंजूर करण्यात आली आहे.

या गॅसदाहिनीचे काम ५७ लाखांच्या निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात ही गॅसदाहिनी उपयोगी ठरणार आहे. परंतु, काही तरी कारणांमुळे वारंवार ही गॅॅसदाहिनी बंद ठेवली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत प्रभाग समिती तीनचे सहायक आयुुुक्त दत्तात्रय गायकवाड याना विचारले असता, ऑपरेटर नियुक्त करून लवकरच ही गॅस दाहिनी सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

Web Title: Gas crematorium in Kupwad closed again without operator