गणपती शिंदे यांचा आष्ट्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:31+5:302021-06-02T04:21:31+5:30

आष्टा : मुख्याध्यापक गणपती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर त्यांच्यावर आदर्शवत संस्कार केले, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष झुंजारराव ...

Ganpati Shinde felicitated in Ashta | गणपती शिंदे यांचा आष्ट्यात सत्कार

गणपती शिंदे यांचा आष्ट्यात सत्कार

आष्टा : मुख्याध्यापक गणपती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर त्यांच्यावर आदर्शवत संस्कार केले, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी केले.

येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक गणपती शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार झुंझारराव पाटील व राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांच्याहस्ते केला, यावेळी पाटील बोलत होते. नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आंबी, समीर नायकवडी, केंद्रप्रमुख पिरजादे उपस्थित होते.

फोटो :

आष्टा येथे मुख्याध्यापक गणपती शिंदे यांचा सत्कार करताना वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, महेश धोत्रे, सुनील आंबी.

Web Title: Ganpati Shinde felicitated in Ashta