शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गुंड बाळू भोकरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, कंत्राटदाराला ठार मारण्याची दिली धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:48 IST

गुन्हा दाखल होताच चार तासात कारवाई

सांगली : कंत्राटदाराला पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय ५०, रा. भोईराज सोसायटी, गणेशनगर) याला सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच चार तासांत अटक केली.गणेशनगर येथील रामभाऊ भिडे जलतरण केंद्राजवळ वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. कंत्राटदार अजय सदाशिव लोखंडे हे दि. २५ रोजी सव्वा चार वाजता कामाच्या ठिकाणी असताना गुंड बाळू भोकरे हा दोन साथीदारांना घेऊन तेथे आला. कामगाराकडे बघून ‘हे काम कोणाचे आहे, येथे काम करायचे नाही’ असे म्हणून कामगार रामलखन पासवान याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला.

लोखंडे हे पुढे गेल्यानंतर भोकरे याने एडक्यासारखे हत्यार दाखवून ‘काम बंद कर नाहीतर जेसीबी, ट्रॅक्टर फोडून टाकतो. तुम्हाला काम करायचे असेल पाच लाखाची खंडणी दे. खंडणी दिली नाहीतर काम करायचे नाही. परत काम चालू केल्यास तुम्हाला ठार मारतो’ अशी धमकी दिली.लोखंडे यांनी शनिवारी रात्री सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोकरेसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांना सूचना दिल्या. त्यानुसार पथक भोकरेचा माग काढत असताना गणेशनगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले.पोलिस कर्मचारी संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिबंळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, दिग्विजय साळुंखे, योगेश सटाले, विशाल कोळी, संदीप कोळी, योगेश हाक्के यांच्या पथकाने कारवाई केली. अटक केलेल्या भोकरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

भोकरेवर दोन वर्षांपूर्वी हद्दपारीबाळू भोकरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, जीवे मारण्याची धमकी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी भोकरे याच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.