शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सांगली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:19 IST

सांगली शहरातील उपनगरांसह बुधगाव येथे एकाच रात्रीत १५ दुकाने फोडत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शहरातील यशवंतनगर, रामकृष्णनगरसह बुधगाव (ता. मिरज) येथे ही घटना घडली. सर्वच ठिकाणी एकाच प्रकारे दुकानांचे शटर उचकटून दुकाने फोडण्यात आल्याने, एकाच टोळीने चोरीचे प्रकार केल्याची शक्यता आहे. यातून पाच हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या चोरीच्या घटनेची सांगली, संजयनगर, कुपवाड औद्योगिक पोलीसात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळसांगली, संजयनगर, कुपवाड औद्योगिक पोलीसात नोंद

सांगली : शहरातील उपनगरांसह बुधगाव येथे एकाच रात्रीत १५ दुकाने फोडत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शहरातील यशवंतनगर, रामकृष्णनगरसह बुधगाव (ता. मिरज) येथे ही घटना घडली. सर्वच ठिकाणी एकाच प्रकारे दुकानांचे शटर उचकटून दुकाने फोडण्यात आल्याने, एकाच टोळीने चोरीचे प्रकार केल्याची शक्यता आहे. यातून पाच हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या चोरीच्या घटनेची सांगली, संजयनगर, कुपवाड औद्योगिक पोलीसात नोंद आहे.बुधगाव येथे बुधवारी रात्री सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्यानंतर, पाळतीवरच असलेल्या चोरट्यांनी सलग १५ गाळ्यांचे शटर उचकटत चोरी केली. यात संदीप चव्हाण यांच्या श्री सिद्धनाथ अ‍ॅल्युमिनिअम व ग्लास वर्क्स या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. मोहन पाटील यांच्या आदित्य कलेक्शन अँड स्पोर्ट गारमेंट या दुकानातून दोनशे रुपये लंपास करण्यात आले.

अश्विनी माळी यांच्या सेजल कलेक्शनमधून पाचशे रुपयांची चिल्लर, संतोष पाटील यांच्या त्रिमूर्ती मेडिकलमधून एक हजार, अनिल पाटील यांच्या किराणा स्टोअर्स येथून पंधराशे रूपये, शिवनेरी पान शॉपमधून सातशे रूपयांच्या सिगारेटची चोरी करण्यात आली.संदीप पाटील यांचे श्री गणेश मोबाईल हे दुकान, विकास कांबळे यांचे रोहिदास फूटवेअर, संतोष भारती यांच्या श्री इलेक्ट्रीकलमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. येथून चोरट्यांनी दीडच्या सुमारास देशी दारू दुकानही फोडून चारशे रूपयांची चोरी करून दारूच्या बाटल्या फोडून नुकसान केले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी यशवंतनगर परिसरात चोऱ्या केल्या.

यात मुख्य चौकातीलच स्वीट कॉर्नर या बेकरीतून आठशे रुपये लंपास केले, तर एस. एन. पान शॉप, एस. के. केशकर्तनालय, हनुमान सप्लायर्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. तसेच रामकृष्णनगर येथील हनुमान सप्लायर्स दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची पोलिसात नोंद आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली