शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Sangli: हॉटेल फोडून साहित्य चोरणारी टोळी जेरबंद, दोघा परप्रांतीयांचा सहभाग 

By घनशाम नवाथे | Updated: January 3, 2025 19:26 IST

सांगली : कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदार फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या ...

सांगली : कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदार फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छडा लावला. संशयित समशुद्दीन महंमद इलियास खान (वय २७, रा. मोमीननगर, पेठवडगाव), महंमद इम्रान अकबर अली (वय २४, रा. पेठवडगाव, मूळ रा. मैना, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), फर्याद आलम महंमद इलियास खान (वय २३, रा. पिपरा पठाण, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहतूक टेम्पो व हॉटेलमधून चोरलेले साहित्य असा ३ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अधिक माहिती अशी, कसबे डिग्रज येथे सहा दिवसांपूर्वी हॉटेल वैभव फोडून आतील साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला होता. तसेच दहा दिवसांपूर्वी हॉटेल शिलेदार येथूनही साहित्य लंपास केले होते. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकास दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास सूचना दिल्या होत्या. पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना कुपवाड एमआयडीसीमध्ये काळ्या रंगाचा मुंबई पासिंग टेम्पो संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सावळी येथे आरटीओ ऑफिसजवळ हा टेम्पो अडवला. टेम्पोच्या हौद्यात मोठ्या गोण्या बांधलेल्या आणि पत्र्याचे तुकडे दिसले. चालक समशुद्दीन खान याची झडती घेतल्यानंतर खिशात रोकड मिळाली. केबिनमध्ये बाजूला बसलेल्या फर्याद खान याच्यासमोरील सॅक उघडून पाहिली. आतमध्ये कटावणी, पक्कड, मारतूल, हॅक्सा ब्लेड मिळाले. हौद्यात भांडी, इलेक्ट्रिक फ्रीज, एसी, मोठी पातेली, ग्राईंडर, हॉटकेस मिळाली नाही. पोलिसांनी तिघांची चौकशी केल्यानंतर कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव, हॉटेल शिलेदारमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. टेम्पो व साहित्य असा ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना मुद्देमालासह सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.गुन्हे अन्वेषणकडील महादेव नागणे, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, संदीप नलवडे, सूरज थोरात, सांगली ग्रामीणचे मेघराज रूपनर, अभिजित पाटील, बंडू पवार, सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली.

भाड्याच्या खोलीत राहून चोरीसमशुद्दीन हा मूळचा मुंबईतील मानखुर्द, शिवाजीनगर येथील आहे. पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. महंमद व फर्याद हे साथीदारही त्याच्यासोबत होते. दोन हॉटेल फोडून त्यातील साहित्य विक्री करत असताना ते पकडले गेले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस