सामूहिक बलात्कार; तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 05:37 IST2019-07-17T05:37:23+5:302019-07-17T05:37:27+5:30

खानापूर तालुक्यातील गार्डी येथील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Gang rape; Life imprisonment for three | सामूहिक बलात्कार; तिघांना जन्मठेप

सामूहिक बलात्कार; तिघांना जन्मठेप

सांगली : खानापूर तालुक्यातील गार्डी येथील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर यांनी मंगळवारी हा निकाल दिला. लक्या ऊर्फ लक्ष्मण संदिपान सरगर (२७), अनुज अर्जुन पवार (२८), दादासाहेब भास्कर आठवले (३०) अशी आरोपींची नावे आहेत. आणखी एक संशयित सागर हत्तीकर याचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.

Web Title: Gang rape; Life imprisonment for three