शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामबागला पती, दिरासह बुवाकडून सामूहिक बलात्कार

By घनशाम नवाथे | Updated: November 6, 2024 22:35 IST

मूल होत नसल्यामुळे कृत्य; अर्जुनवाडच्या बुवासह तिघांना अटक

घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मूल होत नसल्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडून विवाहितेच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील बुवा या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पती, दीर आणि बुवा काशीनाथ रामा उगारे (वय ४०, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ) याला अटक केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला आहे. विवाहानंतर मूल होत नसल्यामुळे तरुणीचा छळ होऊ लागला. कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्यामुळे घरात सतत बुवा, महाराज यांना आणले जात होते. बुवाचे पाय धुऊन पाणी प्यायला लावले जात होते. मूल होत नाही म्हणून तरुणीचा पती, दीर, सासू, सासरे हे छळ करत होते. विश्रामबाग येथील घरी तसेच अर्जुनवाड गावातील मंदिरात तिचा छळ सुरू होता.काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची सासरची मंडळी मोटारीतून जात होती. तेव्हा वाटेत मोटार बंद पडली. त्यांनी अर्जुनवाड येथील बुवा काशीनाथ उगारे याला मोबाइलवरून कॉल केला. त्याला हकिगत सांगितली. तेव्हा त्याने पीडितेच्या कुटुंबीयांना तुमची सून अपशकुनी आहे. तिचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी धार्मिक विधी करण्याचे ठरले.

दुसऱ्या दिवशी विश्रामबाग येथे बुवा काशीनाथ उगारे पीडित तरुणीच्या घरी आला. पूजापाठ झाल्यानंतर तरुणीस अंघोळ करण्यास सांगितले. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि बुवा काशीनाथ यांनी पीडितेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडिता माहेरी गेली होती. काही दिवस ती रडतच होती. अखेर तिच्या आईने वारंवार विचारणा केल्यानंतर तिने घडलेली हकिगत सांगितली. त्यामुळे माहेरच्या मंडळींना धक्का बसला.अखेर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि बुवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच सामूहिक बलात्काराबद्दल पती, दिरासह बुवा काशीनाथवर गुन्हा दाखल केला. पती, दीर, बुवा काशीनाथला अटक केली आहे. तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी