शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

खासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:36 IST

आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटकतिघे जेरबंद : आटपाडीत आठ महिन्यांपूर्वी भरदिवसा लुटीचा प्रकार

सांगली : आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.धनराज ऊर्फ सोन्या सतीश पाटील (वय २५, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, सांगली), रोहित शशिकांत भगत (१९, रा. बिसूर, ता. मिरज) व लक्ष्मण मारुती सिंदगी (२३, रा. साखर कारखाना वसाहत, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.आटपाडी परिसरातील फ्लिपकार्ट, एलआयसी, इंस्टाकार्ट, डिलिव्हरी कंपनी व ईको एक्स्प्रेस कंपनीची रोकड जमा करण्याचे काम मोहन सुखदेव शिंदे (३४) हे करीत होते. ७ आॅक्टोबर २०१९ रोजी दुपारी एकच्यासुमारास शिंदे हे चार कंपन्यांकडील ११ लाख ६२ हजार ३१ रुपयांची रोकड घेऊन करगणी बँकेकडे निघाले होते. यावेळी वाटेत दोन मोटारसायकलस्वारांनी शिंदे यांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जबरी चोरी, घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिदे, हेडकॉन्टेबल बिरोबा नरळे, नीलेश कदम, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलवडे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, शंकर पाटील यांचे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना माधवनगर रस्त्यावरील आरटीओ बसस्थानकाजवळ तिघेजण विनानंबरची मोटारसायकल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.पथकाने छापा टाकून धनराज पाटील, रोहित भगत, लक्ष्मण सिंदगी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, तिघांनी आटपाडीत साडेअकरा लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिली. संशयितांकडून चार लाख दहा हजारांची रोकड, एक लाख १५ हजारांचे तीन महागडे मोबाईल, मोटारसायकल असा ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तब्बल आठ महिन्यांनंतर जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस