वाळेखिंडीत गणेश शिंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST2021-03-09T04:28:51+5:302021-03-09T04:28:51+5:30

शेगाव : वाळेखिंडी (ता. जत) येथील गणेश शिंदे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने शिंदे यांची गावातून मिरवणूक ...

Ganesh Shinde felicitated in Walekhindi | वाळेखिंडीत गणेश शिंदे यांचा सत्कार

वाळेखिंडीत गणेश शिंदे यांचा सत्कार

शेगाव : वाळेखिंडी (ता. जत) येथील गणेश शिंदे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने शिंदे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

शिंदे यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. जिद्द ,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात भरती झाले. १७ वर्षे देश सेवा करून ते घरी परतले. यानिमित्त वाळेखिंडी गावात फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच एन. डी. शिंदे, माजी सरपंच संभाजी शिंदे, एन. एस. शिंदे, सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष विलास शिंदे, अमित सुतार, किरण इतापे, माजी सैनिक ज्ञानदेव सावंत, चंद्रकांत शिंदे, सुधाकर शिंदे, बिभीषण शिंदे, बाबू शिंदे, शरद शिंदे, हरी चव्हाण, विजय शिंदे, उमेश शिंदे, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Ganesh Shinde felicitated in Walekhindi