शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

गणराया, आयुक्तांना कामांबाबत सुबुद्धी दे, सांगली महापालिकेत महाआरती, राष्ट्रवादीचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:21 IST

सांगली महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली. आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. विकासकामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी दिला.

ठळक मुद्देपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी, दोन दिवसात चर्चा घडवण्याचे आश्वासन

सांगली : महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली. आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. विकासकामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी दिला.सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रभागातील विकासकामे अडविली जात असून ती मार्गी लागावीत, या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू आहे.

राष्ट्रवादीच्यावतीने गणरायाच्या आरतीचे आयोजन केले होते. सुरूवातीला गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडेही घातले गेले. आंदोलनस्थळी डिजिटल फलकही लावण्यात आला आहे. त्यावर आता तरी विकासकामे थांबवू नका, असे आयुक्तांना आवाहन केले आहे.दरम्यान, राष्ट्रवादीच्या आंदोलनाची जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दखल घेतली आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, सागर घोडके, विनया पाठक, प्रकाश व्हनकडे, मनोज भिसे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या कामांना मंजुरी देऊन वर्कआॅर्डर द्याव्यात, नगरसेवकांना इंटरेस्ट असल्याचे सांगून विकासकामे अडविली जात आहेत, त्यातून जनतेची दिशाभूल होत असून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, गेल्या दीड वर्षात आयुक्तांनी १८८ कोटीची कामे केली असतील, तर त्याच्या वर्कआॅर्डर कधी देण्यात आल्या, हे जाहीर करावे, आदी मागण्या या निवेदनात केल्या.

आंदोलनात नगरसेवक विष्णू माने, प्रा. पद्माकर जगदाळे, अल्लाउद्दीन काझी, आशा शिंदे, संगीता हारगे, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, अंजना कुंडले, स्नेहल सावंत, आनंदा देवमाने, अभिजित हारगे, प्रसाद मदभावीकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थीसंजय बजाज व शेडजी मोहिते यांनी, नगरसेवक-पदाधिकारी विरुद्ध आयुक्त या सुरू असलेल्या संघर्षात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मध्यस्थी करावी, यासाठी साकडे घातले. यावेळी काळम-पाटील यांनी आयुक्त-नगरसेवकांना एकत्र बसवून दोन दिवसात चर्चा घडवू. कुठे घोडे अडले हे तपासू, असे आश्वासन दिल्याचे बजाज यांनी सांगितले. तोपर्यंत आंदोलन थांबवावे, अशी मागणी केली. परंतु आंदोलकांनी निर्णय झाल्यावर माघार घेऊ, असा पवित्रा घेतला आहे. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका