करंजवडेत आज गजाननराव पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:42+5:302021-09-26T04:28:42+5:30
ऐतवडे बुद्रूक : करंजवडे (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते गजाननराव पाटील यांचा रविवार, दि. २६ रोजी जन्मशताब्दी सोहळा साजरा ...

करंजवडेत आज गजाननराव पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम
ऐतवडे बुद्रूक : करंजवडे (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते गजाननराव पाटील यांचा रविवार, दि. २६ रोजी जन्मशताब्दी सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव मृणाल पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, किरणताई दिलीपराव वळसे -पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू संजय पाटील, हरणाई सहकारी सुतगिरणी खटावचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राहुल महाडिक उपस्थित राहणार आहेत, तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मृणाल पाटील यांनी केले आहे.