शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव; तयार घड कुजले, बागायतदार धास्तावले

By हणमंत पाटील | Updated: December 20, 2023 16:59 IST

प्रदीप पोतदार कवठेएकंद ( सांगली ) : विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर आता नव्यानेच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

प्रदीप पोतदारकवठेएकंद (सांगली) : विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर आता नव्यानेच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रथम दर्शनी काळे चॉकलेटी डाग दिसत आहेत. तर काही दिवसांनी क्रॉचिंग होऊन घडच काळे पडून नासले जात आहेत. त्यामुळे द्राक्षबागेतील तयार घड कुजत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तासगाव, मिरज तालुक्यातील पाचशेहून अधिक एकर द्राक्ष बागेला त्याचा फटका बसला आहे.करपा सदृश ‘झाणतो मानस’ सारख्या रोगाच्या संक्रमणाने बाधित बागेतील तयार मण्यांचे घड कुजून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली द्राक्षे खराब होत आहेत. छाटणीपासून ६० ते ७० दिवस झालेल्या बागांवर असा प्रादुर्भाव आहे.तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, विसापूर, करोली, कवठे एकंद तसेच मिरज तालुक्यातील कवलापूर, सोनी, गावांतील द्राक्ष बागांवर करप्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. अवकाळी पाऊस, वादळ, ढगाळ हवामान अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या द्राक्ष बागायत शेतकऱ्यांसमोर आता नव्यानेच करपा सदृश रोगामुळे संकट निर्माण झाले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी दैनंदिन औषध फवारणी, प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वाढीव खर्च करावा लागत आहे.

संमिश्र वातावरणाचा फटका..कवलापूर भागातील संक्रमित बागांना नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणेच्या संशोधन पथकाने भेट दिली आहे. त्यांच्याकडून संशोधन सुरू आहे. ढगाळ हवामान, धुके त्यानंतर कडक ऊन अशा संमिश्र वातावरणाचा परिणाम झाल्याची शक्यता जाणकार शेतकरी सांगत आहेत.

छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील एका बाजूच्या द्राक्ष घडावर तपकिरी काळे डाग येऊन फळकुजी सारखा प्रकार घडला आहे. बाग टिकवण्यासाठी औषध फवारणी बरोबरच कुजलेले खराब घड बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. - नितीन माळी, शेतकरी, कवलापूर 

द्राक्ष परिपक्वतेच्या काळात कीटकनाशके व अन्य औषध फवारणीचे कमी प्रमाण पाहिजे. जैविक जीवाणूंचा स्प्रे आवश्यक आहे. अति औषधाचा वापर टाळून जैविक व्यवस्थापन केल्यास द्राक्ष शेती वाचू शकते. - संदीप तोडकर, कृषी अभ्यासक.

टॅग्स :SangliसांगलीweatherहवामानFarmerशेतकरी