कोरोनातही मतदारसंघातील विकास कामासाठी निधी उपलब्ध : मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:21+5:302021-05-27T04:29:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कोरोना महामारीच्या काळातही मतदारसंघातील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिलेली नाही, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव ...

Funds available for development work in Corona too: Mansingrao Naik | कोरोनातही मतदारसंघातील विकास कामासाठी निधी उपलब्ध : मानसिंगराव नाईक

कोरोनातही मतदारसंघातील विकास कामासाठी निधी उपलब्ध : मानसिंगराव नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोरोना महामारीच्या काळातही मतदारसंघातील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिलेली नाही, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

कांदे (ता. शिराळा) येथे पालकमंत्री पाणंद योजनेतून मंजूर झालेल्या २० लाख रुपये खर्चाच्या पाणंदीचा व जिल्हा नियोजनमधून झालेल्या १५ लाख रुपये खर्चाच्या कांदे ते भाटशिरगाव रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी आ.नाईक बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण प्रमुख उपस्थितीत होते.

प्रारंभी संजय पाटील यांनी स्वागत केले. आमदार नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला.

यावेळी माजी सरपंच सुवीर चव्हाण, निवास पाटील, माजी उपसरपंच दिलीप पाटील, सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष महादेव चव्हाण, संभाजी पाटील, ए.एन. पाटील, सुभाष पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब बिऊरकर आदी उपस्थित होते. गजानन पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Funds available for development work in Corona too: Mansingrao Naik