शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीला निधी द्या, अन्यथा सामूहिक राजीनामे -: सांगलीत बैठक, निधी नसल्याच्या कारणावरून निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:19 IST

तालुका पातळीवरून विकासकामे करण्यासाठी पंचायत समित्यांना निधीची आवश्यकता असताना, निधी मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नसल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देसदस्यांचा इशारा

सांगली : तालुका पातळीवरून विकासकामे करण्यासाठी पंचायत समित्यांना निधीची आवश्यकता असताना, निधी मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नसल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे निधी मिळणार नसेल, तर पदाची आवश्यकता नाही, असे म्हणत पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

विकास निधीसाठी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र वापरल्याने शासन पातळीवरून निधीबाबत कार्यवाही होणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.सांगलीत गुरुवारी पंचायत समिती सदस्यांना विकास निधीच्या प्रश्नावर मिरजेचे उपसभापती विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. यात सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा सदस्यांनी दिला. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतील २० टक्के निधी जिल्हा परिषदांना मिळत होता. मात्र १४ व्या वित्त आयोगात हा निधी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विकास कामांना निधी मिळणे बंद झाले आहे.

त्यामुळे राज्य शासनाने वित्त आयोगात तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळणाºया वित्त आयोगाच्या निधीच्या प्रमाणात २५ टक्के निधी विकास कामांसाठी द्यावा, सदस्यास विकास कामांसाठी वर्षाला २५ लाख रुपये निधी द्यावा. या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. यावर निधी मिळणार नसेल, तर सदस्यत्वाचा उपयोग नसल्याने सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला.

यावेळी मिरज सभापती शालन भोई, सदस्य अशोक मोहिते, वाळव्याचे सभापती सचिन हुलवान, तासगावच्या सभापती मनीषा माळी, उपसभापती संजय जमदाडे, बेबीताई माळी, खानापूरचे उपसभापती बाळासाहेब नलवडे, सदस्य मारुती शिंदे, कविता देवकर आदी उपस्थित होते.सभापती, सदस्यांच्या विविध मागण्यायावेळी सदस्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. पंचायत समिती सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, पदाधिकारी आणि सदस्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा, कृषी विभागाकडील सर्व योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर चर्चा करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदfundsनिधी