शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रात्री मारहाण करणाऱ्या मित्राचा सकाळी भोसकून खून, बुधगावातील घटना; हल्लेखोरास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 00:59 IST

हल्लेखोर मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

सांगली : कामाच्या वादातून मित्राने रात्री मारहाण केल्याच्या रागातून भर चौकात त्याचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार बुधगाव (ता. मिरज) येथे घडला. गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिकलगार आणि पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. शिकलगार हा सेंट्रिंगची काम घेत होता. तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. बुधगाव येथील एका ‘आरसीसी’ चेंबरचे काम शिकलगार यास दिले होते. शिकलगार याने पट्टेकरी याला हाताखाली घेऊन कामास प्रारंभ केला होता. शिकलगार व पट्टेकरीला दारूचे व्यसन होता. त्यामुळे ज्यांचे काम होते, त्या मालकाने त्यांना ‘तुम्ही दारू पिऊन येता, त्यामुळे माझ्याकडे कामाला येऊ नका’ असे बजावले होते. त्यानंतर शिकलगार याच्याकडून चेंबरचे काम काढून घेण्यात आले.मालकाने पुन्हा हे काम पट्टेकरी याच्याकडे देण्यात आले. शिकलगार याला हा प्रकार समजताच तो पट्टेकरीवर चिडला. बुधवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. शिकलगार याने त्याला ‘माझ्याकडून काढून घेतलेले काम तू का करतोस’ असा जाब विचारला. तसेच त्याला रागातून मारले. या मारहाणीचा पट्टेकरी याला राग आला होता.

गुरूवारी सकाळी उठल्यानंतर देखील पट्टेकरी याला शिकलगारने रात्री केलेल्या मारहाणीचा राग उफाळून आला. त्याने घरातील भंगारात पडलेला चाकू शोधून काढला. सकाळी साडेआठच्या सुमारास पट्टेकरी चाकू घेऊन झेंडा चौकात आला. त्याठिकाणी उभा असलेल्या शिकलगार याला चाकूने भोसकले. छातीवर एकच वार खोलवर झाल्यामुळे शिकलगार गंभीर जखमी होऊन खाली पडला. तेव्हा पट्टेकरी चाकू घेऊन तसाच थांबून राहिला होता.सांगली ग्रामीण पोलिसांना डायल ११२ वरून हल्ल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी शिकलगार याला नातेवाईकांनी उपचारासाठी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पट्टेकरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकलगार याचा भाचा शब्बीर रसूल शिकलगार याने फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट दिली.

एकच खोलवर वाररात्री मारहाण केल्याच्या रागातून पट्टेकरी याने शिकलगार याच्यावर एकच वार करून खून केला. खुनानंतर त्याने पोलिसांना कबुली दिली. पट्टेकरी हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. परंतु त्याच्या व्यसनाला कंटाळून पत्नी दोन मुलांसह पुण्यात राहते. पट्टेकरी हा वृद्ध आईसोबत बुधगावात राहत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस