शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल बनवून केली फसवणूक, सांगलीत डॉक्टर तरुणीला पावणेपाच लाखाला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:48 IST

सांगली : एका नामांकित विवाह संकेतस्थळावर स्वत:ची बनावट प्रोफाइल बनवून सांगलीतील डॉक्टर तरुणीची ४ लाख ७० हजार १३१ रुपयांची ...

सांगली : एका नामांकित विवाह संकेतस्थळावर स्वत:ची बनावट प्रोफाइल बनवून सांगलीतीलडॉक्टर तरुणीची ४ लाख ७० हजार १३१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉक्टर तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित दलजी हाकू या नावाच्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी डॉक्टर तरुणी या डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये एका कम्युनिटी विभागात त्यांनी स्वत:ची नावनोंदणी केली होती. या ॲपच्या माध्यमातून दलजी हाकू या बनावट नावाने प्रोफाइल बनवलेल्या व्यक्तीने डॉक्टर तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर संशयिताने त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे तसेच एका चॅटिंग ॲपच्या माध्यमातून संभाषण करून ओळख वाढविली. वारंवार संभाषण करून त्याने डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने काही कामानिमित्त तिच्याकडून ४ लाख ७० हजार १३१ रुपये घेतले. त्यानंतर तिच्याशी संपर्क कमी केला. तिने पैसे परत देण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु संशयिताने कोणताच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला. त्यामुळे तिने दलजी हाकू या नावाच्या तथाकथित व्यक्तीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली.