भिलवडीत शेतकऱ्याची नऊ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:05+5:302021-07-15T04:20:05+5:30
भिलवडी : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून गणेश ऊर्फ गणपत तातोबा वाघमोडे (रा. मानेवाडी हुन्नर ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) ...

भिलवडीत शेतकऱ्याची नऊ लाखांची फसवणूक
भिलवडी : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून गणेश ऊर्फ गणपत तातोबा वाघमोडे (रा. मानेवाडी हुन्नर ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याने भिलवडी (ता. पलूस) येथील टोळी................................. मालकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत मालन विलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश वाघमोडे याने २ जून २०१८ ते २४ सप्टेंबर २०१८ यादरम्यान नऊ ऊस तोडणी मजूर पुरवितो असे सांगून हंगामाकरिता नोटरी करून रोख स्वरूपात ३ लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी मालन पाटील यांचे पती विलास पाटील यांच्या बँक खात्याव्दारे आरटीजीएसद्वारे ६ लाख असे एकूण ९ लाख घेतले. मात्र त्याने मजुरांचा पुरवठा केला नाही. ऊसतोड मजूर न पुरविता फसवणूक करून रकमेचा अपहार केला. याप्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात गणेश वाघमोडे याच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करत आहेत.