शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जागा विकसन करारातून ३६ लाखांची फसवणूक, मिरजेतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:05 IST

सांगली : जागा विकसित करण्यास देतो असे सांगून करारपत्र करून सांगलीतील फर्मची ३६ लाख ६० हजार रुपयांस फसवणूक केल्याचा ...

सांगली : जागा विकसित करण्यास देतो असे सांगून करारपत्र करून सांगलीतील फर्मची ३६ लाख ६० हजार रुपयांस फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार, जास्मिन महंमदसाब नायकवडी-इनामदार (रा. गुरुवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या दोघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अशोक चंद्राप्पा मासाळे (वय ४४, रा. टिंबर एरिया, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी मासाळे यांची श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सल्टंट ही फर्म आहे. ते भूविकासक म्हणून व्यवसाय करतात. संशयित इब्राहिम आणि जास्मिन नायकवडी यांनी मिरजेतील दोन गट नंबरमधील तसेच सिटी सर्व्हेतील मिळकतीचे उतारे फिर्यादी मासाळे यांना दाखवले. या जागा विकसित करण्यासाठी देऊ असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर मासाळे यांच्या टिंबर एरियातील ऑफिसमध्ये विकसन (डेव्हलपमेंट) करारपत्र केले. करारापोटी ३६ लाख ६० हजार १०० रूपये इतकी रक्कम धनादेशाने आणि रोखीने स्वीकारली. त्यानंतर दोघेजण टाळाटाळ करू लागले.

मासाळे व त्यांचे मित्र नेमगोंडा बाबा पाटील, किरण आडमुठे हे संशयित नायकवडी यांच्या मिरजेतील छलवादी गल्लीत केले. तेव्हा इब्राहीम व जास्मिन हे दोघे त्यांना, ‘आम्ही तुम्हाला जागा देणार नाही. आमची केस मिटल्यानंतर इतर व्यक्तींना जागा विकून तुमचे पैसे देऊ. परंतु तोपर्यंत आमच्या विरोधात तक्रार दिल्यास आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करू. महाराष्ट्रात आमचे कोणीही वाकडे करू शकले नाही. तुम्ही जर पुन्हा जमिनीच्या व्यवहाराबाबत फोन केला तर माझ्याइतका वाईट कोणी नाही.’ असे म्हणून धमकी दिली.मासाळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित इब्राहीम व जास्मिन नायकवडी या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस