महापालिका क्षेत्रात चौथे सिरो सर्व्हे २५ जूनपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:32+5:302021-06-20T04:19:32+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथे सिरो सर्वेक्षण येत्या २५ जूनपासून होणार आहे. यासाठी आराेग्य पथक सांगली, मिरजेत ...

Fourth Siro survey in municipal area from 25th June | महापालिका क्षेत्रात चौथे सिरो सर्व्हे २५ जूनपासून

महापालिका क्षेत्रात चौथे सिरो सर्व्हे २५ जूनपासून

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथे सिरो सर्वेक्षण येत्या २५ जूनपासून होणार आहे. यासाठी आराेग्य पथक सांगली, मिरजेत सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.

डॉ. ताटे म्हणाले की, महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे आणि मिरज उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली काेरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी धोका कायम आहे. त्यामुळे आरोग्य पथकामार्फत २५ जून रोजी सांगली, मिरजेतील काही निश्चित केलेल्या ठिकाणी नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. या सर्व्हेतून महापालिका क्षेत्रात कोविडची परिस्थिती काय आहे, याची माहिती मिळणार आहे. या सिरो सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Fourth Siro survey in municipal area from 25th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.