शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: कवठेमहांकाळमध्ये बनावट नोटा जप्त, कर्नाटकातील भामट्यास अटक; एकजण पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:01 IST

एका बेकरीमध्ये बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न

शिरढोण : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुना बसस्थानक चौकातील एका बेकरीमध्ये बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोपट धोंडीबा शेरखाने (वय २६, रा. नवलिहाळ, ता. अथणी) या भामट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. कारवाईदरम्यान पोपट याचा भाऊ अशोक शेरखाने पसार झाला.कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुन्या बसस्थानक परिसरातील एका बेकरीत पोपट व अशोक शेरखाने हे सख्ख्ये भाऊ खरेदीच्या बहाण्याने आले होते. काही वस्तू खरेदी करून त्यांनी दुकानदारास पैसे देऊ केले. यावेळी दुकानदारास या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्या. त्यांनी जुने बसस्थानक चौकातच कवठेमहांकाळ-जत रस्त्यावर वाहन तपासणीसाठी उभे असलेले पोलिस नाईक सचिन पाटील यांना बोलावून घेत नोटा बनावट असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांना पाहून पोपट व अशोक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. सचिन पाटील यांनी पाठलाग करून पोपट शेरखाने यास ताब्यात घेतले, तर अशोक फरार होण्यात यशस्वी झाला. कवठेमहांकाळ पोलिसांनी शेरखाने याची तपासणी केली असता त्याच्याकडे १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्यास अटक करून अशोक शेरखाने याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय ठिकाणे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस