शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चार वर्षांचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने बालक बचावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:03 IST

Sangli Leopard Attack: परिसरात भीतीचे वातावरण

Sangli Leopard Attack: गिरजवडे (ता.शिराळा) येथील मुळीकवाडीत आजोबांसोबत शेतात गेलेल्या अवघ्या चार वर्षांच्या आरव अमोल मुळीक या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. या हल्ल्यात आरव गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बजरंग मुळीक हे नातू आरवला घेऊन गावाजवळील पाचिरो पाडा शिवारात पशुखाद्यासाठी गवत आणायला गेले होते. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक आणि राजेश्री मुळीक उपस्थित होते. अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरववर झडप घालून त्याला उसाच्या शेतात फरपटत नेले. काशिनाथ मुळीक यांनी धाडसाने धाव घेत, बिबट्याला हुसकावून लावत आरवची सुटका केली. बजरंग व मोहन मुळीक यांनी आरवला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.अनिरुद्ध काकडे आणि डॉ.मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार केले. सरपंच सचिन देसाई यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच त्याच बिबट्याने घागरेवाडी येथे बांधकाम स्थळाजवळ कामगारांच्या दुचाकीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्रा.सुशीलकुमार गायकवाड, सत्यजीत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन आरवची विचारपूस केली.यापूर्वी शाहूवाडी, शिराळा तालुक्यात हल्ल्यांचा घटनायापूर्वीही शाहुवाडी आणि शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांत लहान मुले व नागरिक ठार किंवा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी ठार झाले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Leopard attacks four-year-old; villagers save child's life.

Web Summary : In Sangli, a four-year-old was severely injured in a leopard attack. Alert villagers rescued him from the leopard's grasp. He's hospitalized in Karad. The leopard also attempted to attack commuters nearby, creating panic in the area. Forest officials are investigating.
टॅग्स :Animalप्राणीSangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग