मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस 

By संतोष भिसे | Published: February 2, 2024 05:12 PM2024-02-02T17:12:42+5:302024-02-02T17:13:06+5:30

मिरज : सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई- हुबळीदरम्यान उद्या दि. ३ व ४ रोजी चार विशेष ...

Four special express between Mumbai and Hubli via Miraj | मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस 

मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस 

मिरज : सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई- हुबळीदरम्यान उद्या दि. ३ व ४ रोजी चार विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडणार आहे. या चारही एक्सप्रेस मिरजमार्गे धावणार आहेत.

विशेष एक्सप्रेस दि. ३ रोजी रात्री १२:४० वाजता मुंबईहून निघेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता हुबळी येथे पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ४ रोजी रात्री ९:३० वाजता हुबळीतून निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुंबईला पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ३ रोजी दुपारी दीड वाजता मुंबईहून निघेल. 

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:२० वाजता हुबळी येथे पोहोचेल. विशेष एक्सप्रेस दि. ४ रोजी रात्री आठ वाजता हुबळीहून निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १:३५ वाजता मुंबईला पोहोचेल. या एक्सप्रेसला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, जेऊर, कुरडूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगावी, लोंढा व धारवाड या स्थानकात थांबा आहे.

Web Title: Four special express between Mumbai and Hubli via Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.