शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: खासगी बस-मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार, यात्रेला जाताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:32 IST

मृत सांगली जिल्ह्यातील गव्हाण गावचे

दिलीप मोहितेविटा (सांगली) : भरधाव खासगी बस व मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. हा अपघातसांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) शहराजवळ आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास झाला. मृतात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही गव्हाण (ता. तासगाव) येथील काशीद कुटुंबातील आहेत. अपघातात सुनीता सदानंद काशीद, चंद्रकांत दादाबो काशीद, अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्व रा. गव्हाण, ता. तासगांव, जि. सांगली) आणि बदली मोटार चालक योगेश कदम (रा. मालाड, मुंबई) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील सदानंद काशीद हे सध्या आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या गावची शुक्रवारी यात्रा असल्याने काशीद हे मालाड मुंबई येथून आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथील बदली मोटार चालक योगेश कदम यांना घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून आज गुरुवारी मध्यरात्री मालाडहुन आपल्या गावी गव्हाणकडे निघाले होते. गुरूवारी सकाळी साडे सात वाजण्याच्य सुमारास विटा शहराजवळ नेवरी रस्त्यावर त्यांची मोटार आली असताना विट्याहून प्रवाशी उतरून नेवरी गावाकडे निघालेल्या गीतांजली ट्रॅव्हल्स (क्र. ए .आर. - ०१- जे८४५२) या  खासगी बसवर चालकाच्या बाजूला कारची जोरदार धडक झाली. यात कारमधील सदानंद काशीद हे जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि मालाड येथील बदली मोटार चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले.हा अपघात इतका भीषण होता की धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सदानंद काशीद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचे वृत गव्हाण गावात समजताच गावावर शोककळा पसरली. ऐन यात्रेच्या कालावधीत काशीद कुठुंबियांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू