गोटखिंडीत चार दिवस कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:45+5:302021-05-05T04:42:45+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात चार दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे. हा जनता ...

गोटखिंडीत चार दिवस कर्फ्यू
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात चार दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे. हा जनता कर्फ्यू दिनांक ५ व ६ आणि ८ व ९ मे रोजी असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच विजय लोंढे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री एटम, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, आशिष काळे, पंचायत समितीचे एच. व्ही. कुंभार, नंदकुमार पाटील, राहुल भोईटे, डॉ. प्रा. अशोक कुलकर्णी, संजय माने, डॉ. राजीव पाटील, डॉ. वर्षाराणी मोहिते, आदी उपस्थित होते. शुक्रवार, ७ रोजी मात्र सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरु राहतील. चार दिवसांच्या बंद काळात सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ यावेळेतच दूध संकलन करण्यासाठी बंधनकारक केले आहे. हे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.