कासेगावात चार सीसीटीव्ही भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:14+5:302020-12-12T04:42:14+5:30

कासेगाव : आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कासेगाव (ता. वाळवा) येथील माने बंधूंनी गावच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही यंत्रणा भेट देऊन अनोखी ...

Four CCTV visits in Kasegaon | कासेगावात चार सीसीटीव्ही भेट

कासेगावात चार सीसीटीव्ही भेट

कासेगाव : आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कासेगाव (ता. वाळवा) येथील माने बंधूंनी गावच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही यंत्रणा भेट देऊन अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे. गावात महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. यामुळे गुन्हेगारीवर व चुकीच्या गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.

कासेगाव येथील धोंडीराम माने व द्रौपदा माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी हा उपक्रम राबविला. लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवराज पाटील म्हणाले की, माने बंधूंनी गावच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा देऊन चांगले काम केले आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

सोमनाथ वाघ म्हणाले की, या भेटीमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. छेडछाड, चोरी आदी घटनांना आळा बसेल.

प्रशासनाच्यावतीने माने कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आण्णा माने, आनंदराव माने, दि रयत बँक सोसायटीचे अध्यक्ष अशोक माने, माजी जिल्हा परिषद सदस्या अंजना तोडकर, प्रल्हाद माने, शंकरराव भोसले, सुरेश गावडे, अभिजित तोडकर, ग्रामसेवक राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

फोटो - १११२२०२०-आयएसएलएल-कासेगाव सीसीटीव्ही न्यूजसीसीटीव्ही न्यूज

फोटोओळ : कासेगाव (ता. वाळवा) येथे माने कुटुंबियांकडून सीसी टीव्ही लोकार्पण करण्यात आले. यावेळी देवराज पाटील, जनार्दन पाटील, सोमनाथ वाघ, आण्णा माने, किरण पाटील, दाजी गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Four CCTV visits in Kasegaon