शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

By शीतल पाटील | Updated: May 2, 2023 19:00 IST

बेटिंग लावणारे २३ जण रडारवर

सांगली : शहरातील कुपवाड परिसरात आयपीएलच्या सामन्यावर बेटींग घेणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले असून मोबाईल, लॅपटाॅप, वाहनासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.विश्वनाथ संजय खांडेकर (वय २२, रा. गंगानगर रोड वारणाली), रतन सिद्धू बनसोडे (२७, रा. अलिशान काॅलनी, कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (२१, रा. झेडपी काॅलनी, वारणाली), संतोष सुरेश घाडगे (१९, रा. महावीरनगर, विश्रामबाग) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीकडून नऊ मोबाईल, चार दुचाकी, एक लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीच्या पथकाला दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी कारवाईसाठी पथक नियुक्त केले होते. पथकातील दीपक गायकवाड व प्रशांत माळी यांना कुपवाड ते वाघमोडेनगर रस्त्यालगत एका शेतातील शेडमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतले जात असल्याची माहिती मिळाली. लखनऊ व बेंगलोर या संघातील सामन्यासाठी बेटींग सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिस पथकाने तातडीने शेतातील शेडमध्ये छापा टाकला. यावेळी चौघेजण लॅपटाॅप, मोबाईलच्या सहाय्याने बेटींग घेत असल्याचे दिसून आले. विश्वनाथ खांडेकरसह चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. खांडेकर याची चौकशी केली असता क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ॲपद्वारे बेटींग घेत असून धावासाठी एक रुपयाला एक रुपया तर हार जीवर वाढीव भावाने पैसे असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल, लॅपटाॅप, वही, पेन व दुचाकी वाहने असा २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेटिंग लावणारे २३ जण रडारवरबुकी विश्वनाथ खांडेकर याच्याकडून पोलिसांनी डायरी जप्त केली आहे. या डायरीत बेटींग खेळणारे व खेळविणाऱ्या २३ जणांची नावे व मोबाईल नंबर आहेत. त्या २३ जणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीIPLआयपीएल २०२३Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस