खानापूरचे माजी सभापती जालिंदर शिंदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:58+5:302021-08-18T04:32:58+5:30
लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र ज्येष्ठ नेते जालिंदर बापू हरिबा शिंदे (८६) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

खानापूरचे माजी सभापती जालिंदर शिंदे यांचे निधन
लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र ज्येष्ठ नेते जालिंदर बापू हरिबा शिंदे (८६) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. खानापूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, लेंगरे गावचे सर्वाधिक काळ सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले हाेते.
खानापूर तालुक्यात बापू म्हणून जालिंदर शिंदे यांची ओळख होती. लेंगरे ग्रामपंचायतीचे १९८४ ते १९९७ असे सर्वाधिक काळ सरपंच राहण्याचा मान त्यांना मिळाला. लेंगरे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि पीर कलंदर यात्रेतील मानकरी असणाऱ्या बापूंना गावात आदराचे स्थान होते. १९९७ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी लेंगरे जिल्हा परिषद गटात भरघोस विकासकामे उभी केली. आमदार अनिल बाबर यांचे समर्थक असलेल्या बापूंना २००२ मध्ये खानापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अडीच वर्षे आणि त्यानंतर सभापती म्हणून अडीच वर्षे संधी मिळाली. या कालावधीत त्यांनी खानापूर पंचायत समितीचा लौकिक वाढवला. सभापती म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजकारणातून अलिप्त राहत मार्गदर्शकाची भूमिका घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.