दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:06+5:302020-12-11T04:54:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या साथीने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील जनता भरडून निघाली असल्याने दोन वर्षातील घरपट्टी, ...

Forgive the two-year home strip, the water strip | दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा

दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या साथीने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील जनता भरडून निघाली असल्याने दोन वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी व दंड महापालिकेने माफ करावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने आयुक्त व पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त नितीन कापडणीस व विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात २०१९ मध्ये महापूर व चालूवर्षी कोरोना साथीने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील जनता आर्थिकदृष्ट्या मोडून पडली आहे. त्यामुळे या दोन वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी. थकीत घरपट्टी वरील संपूर्ण दंड व्याज माफ करावे. चालूवर्षी घरपट्टी वसुली सक्तीची करू नये, अशी मागणी करण्यात आली

रस्ते दुभाजक बसवताना ते कायमस्वरूपी बसवावेत तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात अजून सुमारे ४० चौकांत सिग्नल बसवावेत, चौकांचे सुशोभिकरण करावे, अशी मागणीही केली. आयुक्त कापडणीस म्हणाले की, निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही चालूवर्षी घरपट्टी सक्तीने वसूल करणार नाही. जानेवारीत अभय योजनेअंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टीची दंड व व्याज वसुली माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

यावेळी प्रदीप बर्गे, अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, संदीप शिंत्रे, प्रा. नंदकुमार सुर्वे, अनिल पाटील, प्रकाश लवटे, शिवम शहा आदी उपस्थित होते.

Web Title: Forgive the two-year home strip, the water strip