जैन मित्रमंडळातर्फे अन्नदान, चारा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST2021-04-28T04:28:47+5:302021-04-28T04:28:47+5:30

महावीर जयंतीनिमित्त जैन मित्र मंडळातर्फे मिरजेतील आस्था बेघर निवारा केंद्रात खाद्यपदार्थांचे वाटप झाले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जैन ...

Food donation, distribution of fodder by Jain Friends | जैन मित्रमंडळातर्फे अन्नदान, चारा वाटप

जैन मित्रमंडळातर्फे अन्नदान, चारा वाटप

महावीर जयंतीनिमित्त जैन मित्र मंडळातर्फे मिरजेतील आस्था बेघर निवारा केंद्रात खाद्यपदार्थांचे वाटप झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जैन मित्र मंडळातर्फे महावीर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

अमीझरा मंदिरात सकाळी महावीर जन्माचे धार्मिक विधी झाले. त्यानंतर खिचडी घरमध्ये मिठाई वाटप झाले. बेघर निवारा केंद्र, बाल सुधारगृह, मिरजेतील बेघर निवारा केंद्र येथे खाद्यपदार्थ दिले. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वाटप झाले. मंडळाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. दुपारी चार विविध ठिकाणच्या गोशाळांमध्ये चारा वितरण झाले. यावेळी जवाहरलाल चौपडा, अशोक जैन, तीर्थराज जैन, जितेंद्र जैन, महावीर भंसाळी, राजू ओसवाल, राजेंद्र रांका, प्रकाश भंसाळी, संतोष भंसाळी, सिद्धार्थ भंसाळी, राज नाणेशा, अभिषेक भंसाळी, दर्शन नाणेशा, आदी उपस्थित होते.

Web Title: Food donation, distribution of fodder by Jain Friends