शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 18:46 IST

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करुन ही करवाई करण्यात आली

ठळक मुद्देसांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्तअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सांगली : सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करुन ही करवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत शिवशक्ती नारायण फरसाण ॲन्ड स्वीटस, हसनी आश्रम रोड, महालक्ष्मी चौक, मिरा कॉलनी, विश्रामबाग, सांगली या आस्थापनेची तपासणी करुन करवाई करण्यात आली.

भेसळीच्या संशयावरुन रिफईन्ड पामोलिन तेल, फरसाण (बालाजी), व खारी बुंदी (बालाजी) या अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ९०६ किग्रॅ बजनाचा ९७ हजार ३८० रुपये इतका साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.या आस्थापनेची तपासणी केली असता पेढीमध्ये वापरलेले खाद्यतेल हे अस्वच्छ बॅरल मध्ये साठविले होते व ते फरसाण आणि बुंदी तळण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. फरसाण व बुंदी बनविण्याकरिता खाद्य रंगाचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच पेढीमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे आढळून आले आहे.

या खाद्यपदर्थाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. फरसाण पॅकिगसाठी वापरण्यात येणारे लेबल चुकीच्या वर्णनाचे वापरण्यांत येत होते. पेढीविरुध्द खद्य रंगाचे वापर केल्याबाबत यापूर्वीही फौजदारी कारवाई झाली आहे. तरी सुध्दा ती फरसाण बनवितांना त्यात वापरास प्रतिबंध असलेला खाद्य रंगाचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सांगली सु. आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, श्रीमती हिरेमठ, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली