लसीकरणासाठी लसटोचकांच्या पुन्हा नियुक्तीसाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:11+5:302021-07-09T04:18:11+5:30
सांगली : लस टोचणीसाठी कंत्राटी स्वरुपात नेमलेल्या १४७ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने स्वत:हून कमी केलेले नाही. शासनाच्या आदेशानुसारच कार्यवाही ...

लसीकरणासाठी लसटोचकांच्या पुन्हा नियुक्तीसाठी पाठपुरावा
सांगली : लस टोचणीसाठी कंत्राटी स्वरुपात नेमलेल्या १४७ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने स्वत:हून कमी केलेले नाही. शासनाच्या आदेशानुसारच कार्यवाही केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाभरातील लसीकरण केंद्रांवर कंत्राटी स्वरुपात १४७ लसटोचकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत ३० जून रोजी संपली. सध्या लसीकरणाने गती घेतल्याने लसटोचकांची गरज आहे, तरीही त्यांना कार्यमुक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यावर डुडी म्हणाले, लसटोचकांची नियुक्ती मे महिन्यापर्यंत होती. आम्ही एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यांच्या पगारासाठी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो संपल्याने कार्यमुक्त करावे लागले. सध्या एका महिन्याचा पगार देणे बाकी आहे, तो लवकरच देऊ. यापुढे निधी मिळणार नाही, असे स्पष्ट झाल्याने नियुक्ती रद्द करण्यात आली. शासनाने जिल्ह्यासाठी १६२ परिचारिका दिल्याने लसीकरणावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी लसटोचणीचे काम केले. कार्यमुक्त केलेल्या लसटोचकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.