संभाव्य पुरात प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:34+5:302021-06-23T04:18:34+5:30

अंकलखोप : कृष्णाकाठावरील नागरिकांनी संभाव्य महापुरात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी जावे. प्रशासनाने ज्या ठिकाणी सोय केली आहे, ...

Follow the instructions of the potential flood administration | संभाव्य पुरात प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा

संभाव्य पुरात प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा

अंकलखोप :

कृष्णाकाठावरील नागरिकांनी संभाव्य महापुरात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी जावे. प्रशासनाने ज्या ठिकाणी सोय केली आहे, त्या ठिकाणी नागरिकांना पाठवावे, अशा सूचना कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी ग्रामसेवक, तलाठ्यांना दिल्या.

अंकलखोप (ता. पलूस) येथे तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कृष्णा नदीकाठच्या गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची महापुराबाबत आढावा बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी मरकड बोलत होते. यावेळी तासगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आदी उपस्थित होते.

मरकड पुढे म्हणाले, कृष्णेचा पूर लक्षात घेऊन लोकांनी स्वत:हून स्थलांतरासाठी सहकार्य केले पाहिजे. महापूर आलाच, तर एकाही व्यक्तीला बोटीतून बाहेर काढण्याची वेळ येऊ नये. नागरिकांना स्थलांतरित होण्याबाबत प्रशासनाकडून सूचना मिळताच स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Web Title: Follow the instructions of the potential flood administration