शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Sangli: जत तालुक्यात चारा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:42 IST

दुष्काळाच्या झळा वाढल्या, पशुपालक धास्तावल्याचे चित्र

दरीबडची : जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्याने दुभती जनावरे धापा टाकू लागले आहेत. उष्मांकाच्या झटक्याने दुभत्या म्हशी, गाई जायबंदी होत आहेत. नवजात रेडके,वासरे दगावू लागली आहेत. अशक्त जन्माला येऊ लागले आहेत. दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. गाभण म्हैशीचे हाल होत आहेत. पशुपालक धास्तावल्याचे चित्र आहे. पाणी आणि चारा टंचाईने दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे.खिलार जनावरांसाठी व माडग्याळ मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. कोरडवाहू जमीन, डोंगराळ भाग, पडीक जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे पालन करणे सुलभ आहे. तालुक्यात गाई-बैल ७० हजार ९१६, म्हैशी ७० हजार ५८ शेळ्या ४५ हजार ९६४ मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७ अशी एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरे आहेत.तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानाचा झटका दुभत्या म्हशी गाई जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. संकलनात घट झाली आहे. दूध डेअरीतून ग्राहकांना ५० ते ६० रुपये लिटरने दुधाची विक्री होत आहे.अनेक आजारांची लागण उन्हाळ्यामुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होणे, ताप येणे, अपचन होणे, लाळ खुरकत येणे आजारांची लागण होत आहे. यातून जनावरांच्या जीविताला धोका पोहोचू लागला आहे.

गर्भपाताचे मोठे संकट वाढत्या तापमानामुळे जनावरावर गर्भपाताचे महासंकट उभा राहिले आहे. दिवस न भरताच गर्भपात होत आहेत. वांझ प्रमाणात वाढ झाली आहे.पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष आहे.या उपाययोजना कराव्यात 

  • जनावरांना सावलीत बांधावे.
  • दिवसातून स्वच्छ पाणी चार ते पाच वेळा पाजावे.
  • सावलीसाठी शेड नेट उभारावा. त्याच्या सभोवती वातावरणात थंडावा रहाण्यासाठी भिजवून पोती बांधावेत..
  • डिहायड्रेशन होऊ नये म्हणून कॅल्शियम पावडर व ओरल ५० ते १०० ग्रॅम चारातून द्यावा.
  • एक वेळा ओला चारा द्यावा. सुका एक वेळ द्यावा

‘वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी जनावरे सावलीत बांधावेत. जादा पाणी पाजावे. कॅल्शियम आहारातून द्यावेत. पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी.’ - डाॅ कुणाल कांबळे, तालुका पशुसंर्वधन विस्तार अधिकारी जत

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळ