शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला 'घड्याळ' कोणाच्या हातात?; रोहित पाटील, प्रभाकर पाटलांच्या भूमिकेचे औत्सुक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 17:15 IST

प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार?

दत्ता पाटील तासगाव : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा हक्क असल्याचा निर्णय झाला. त्यानंतर तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ कोणाच्या हातात असणार ? असा प्रश्न तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेस आला आहे. ‘भावी आमदार’ म्हणून सज्ज झालेले रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील यांची वाटचाल काय असणार ? याबाबत देखील उत्सुकता आहे.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, आर. आर. पाटील आणि घड्याळ हे समीकरण विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर कायम राहिले. आर. आर. पाटील यांच्या पश्चात देखील मतदारसंघात घड्याळाचा गजर होत राहिला. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आर. आर. आबांच्या कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला.निवडणूक आयोगाच्या निकालात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे सद्य:स्थितीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू असलेला राष्ट्रवादी पुन्हा आणि घड्याळाचा गजर थांबणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी रोहित पाटील यांना निश्चित मानली जात आहे.भाजपकडून खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीवर अद्याप मोहोर उमटलेली नाही. महायुतीच्या फॉर्म्युल्यात तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला जाणार असल्याची चर्चा होत आहे. तसे झाल्यास पवार गटाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार ? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. या मतदारसंघावर घड्याळाचा प्रभाव असल्यामुळे, या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहिला तर विधानसभेसाठी हे घड्याळ हातात कोण बांधणार ? याबाबत मतदारसंघात चर्चा होत आहे.

प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार?खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांनी काही दिवसांपासून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बदलत्या राजकीय समीकरणे आणि घड्याळ चिन्हाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपचे प्रभाकर पाटील विधानसभेसाठी हातात घड्याळ बांधणार का? अशीही चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Patilरोहित पाटिल