चॉकलेटस, गिफ्टस आणि गुलाबाच्या साथीने प्रेमाला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:00+5:302021-02-15T04:24:00+5:30

सांगली : व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाब फुलांच्या किमती भलत्याच वाढल्या आहेत. रविवारी किरकोळ बाजारात लांब दांड्याचा एक गुलाब ३० ...

Flowers bloom with chocolates, gifts and roses | चॉकलेटस, गिफ्टस आणि गुलाबाच्या साथीने प्रेमाला बहर

चॉकलेटस, गिफ्टस आणि गुलाबाच्या साथीने प्रेमाला बहर

सांगली : व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाब फुलांच्या किमती भलत्याच वाढल्या आहेत. रविवारी किरकोळ बाजारात लांब दांड्याचा एक गुलाब ३० रुपयांना विकला जात होता. उलाढाल मात्र फार झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

व्हॅलेंटाईनमुळे रविवारी पहाटे सौद्यासाठी मोठ्या प्रमाणात गुलाबांची आवक झाली. शिरोळ, कागवाड, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांतून शेतकऱ्यांनी एकदमच फुले सौद्यासाठी आणली. तरीही त्यांना चांगला दर मिळाला. डच फुलांचा वीस नगांचा बंडल २५० ते ३०० रुपयांना विकला गेला. दोन दिवसांपर्यंत हाच दर अवघा १५० रुपये होता. आवक वाढल्याने अपेक्षित दर मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

व्हॅलेंटाईनसाठी शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवली होती, त्यामुळे गेले आठवडाभर बाजारात गुलाबांची टंचाई होती. तरीही दर १०० ते १२० रुपये बंडल असे राहिले. गुलाबांना बहर आला तरी तरुणाईच्या प्रेमाचा बहर मात्र थंडच राहिला. रविवार असल्याने शाळा-महाविद्यालयांना सुटी होती, त्याचा परिणाम सेलिब्रेशनवर झाला. शहरातील फूल विक्रेत्यांनी आकर्षक सजावट करुन प्रेमवीरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण सुटीमुळे वर्दळ फारशी नव्हती. आमराई, वसंतदादा समाधी परिसर येथे काही प्रमाणात वर्दळ राहिली. भेटवस्तूंच्या दुकानातही विशेष गर्दी नव्हती.

कोट

गुलाबाचे दर तेजीत होते, पण अपेक्षेप्रमाणे उलाढाल झाली नाही. रविवारची सुटी असल्याचा फटका बसला. आता सोमवारी काही प्रमाणात सेलिब्रेशनची अपेक्षा आहे.

- निखील गदादे, फूल विक्रेता.

Web Title: Flowers bloom with chocolates, gifts and roses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.