शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आस्मानी संकटाने कवठेएकंद, तासगाव परिसरातील फुलशेती कोमेजली; लहरी हवामानाचे आव्हान कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:43 IST

उतरत्या दराचाही बसतोय फटका

प्रदीप पोतदारकवठेएकंद : अति पावसाच्या फटक्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तासगाव तालुक्यातील बागायती शेतीलादेखील घरघर लागली आहे. यंदा अति पावसामुळे फुल शेतीही कोमेजू लागली आहे. सध्या गुलाब, झेंडू, गलांडा, शेवंती अशा फुलांवर दावण्या आणि करपा रोगाचे संकट आहे. अति पावसाच्या परिणामामुळे फुलशेतीस मोठे आव्हान उद्भवले आहे.तासगाव आणि परिसरात प्रामुख्याने गुलाब, झेंडू, गलांडा अशी फुलशेती नेहमी बहरलेली असते. तासगावचा गुलाब मुंबई मार्केटसह सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु यंदा सततच्या पावसामुळे फुलशेतीसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. मे महिन्यापासून सातत्याने परिसरात पाऊस पडत आहे. अति पावसामुळे झेंडू व इतर फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. अति पाण्यामुळे शेकडो एकर फुलांचे क्षेत्र वाया गेले आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यावेळी फुलांना चांगला दर मिळतो. या अपेक्षेने अनेक जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे ओढ घेतली होती, मात्र यंदा सततच्या पावसामुळे उत्पादन घेता आले नाही. परिणामी शेती पूर्णपणे नुकसानीत गेली आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये शेवंती आणि झेंडूचे दर २० ते ३० रुपये प्रति किलो तर गुलाबाचे ८० ते १०० रुपये प्रति किलो आहेत. लोकल मिरज मार्केटमध्ये गलांडा आणि झेंडू प्रति किलो ३० रुपये दरात विकले जात आहेत. दसऱ्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च सहन करावा लागत आहे.वाढती मजुरी, व्यापारी कमिशन, दलाली आणि बाजारातून मिळणाऱ्या किमतीमुळे फुलशेती तोट्यात जात असल्याचे फुलशेतकरी सांगतात. मुंबई मार्केटमध्ये पंधरा टक्के व्यापारी कमिशन घेतात. तर मिरज लोकल मार्केटमध्ये झेंडू, गलांडा, शेवंती फुलांसाठी प्रति दहा किलोला एक किलो सूट घेतली जाते. त्यात दहा ते पंधरा टक्के दलाली साधारणपणे कापली जाते. तासगाव तालुक्यात येळावी, मणेराजुरी, कवठे एकंद, बेंद्री, तासगाव परिसरात गुलाब व झेंडू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते; मात्र उत्पादनखर्च खर्च फुलशेतीस पेलत नाही. सणासुदीला फुलांना चांगला दर मिळाला; पण आता दर पडले आहेत.

गुलाब शेतीवर अति पावसामुळे करपा आणि दावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक गुलाब शेती टिकवणे अति पावसाच्या तडाख्यामुळे मोठे आव्हान बनले आहे. गुलाब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाने फुलशेतीला अनुदान द्यावे, अशी मागणी फुलशेतकऱ्यांनी केली आहे. -  सुधीर मिरजकर, फुलशेतकरी, तासगाव.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Flower Farming Hit Hard by Unseasonal Rain, Faces Losses

Web Summary : Unseasonal rains in Sangli's Kavthe Ekand and Tasgaon have devastated flower farming, causing significant losses. Rose, marigold, and other flower crops are affected by diseases, leading to reduced yields and financial strain on farmers already burdened by rising costs and market fluctuations. Government support is needed.