मिरजेत चोरीतील पाच तोळे दागिने सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST2021-07-30T04:29:14+5:302021-07-30T04:29:14+5:30

शेतीपंप दुरुस्ती करणारे उत्तम यल्लाप्पा नाईक यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत बुधवारी सव्वापाच लाखांच्या ऐवजाची चोरी झाल्याची फिर्याद दिली ...

Five weights of stolen jewelery were found in Miraj | मिरजेत चोरीतील पाच तोळे दागिने सापडले

मिरजेत चोरीतील पाच तोळे दागिने सापडले

शेतीपंप दुरुस्ती करणारे उत्तम यल्लाप्पा नाईक यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत बुधवारी सव्वापाच लाखांच्या ऐवजाची चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी नाईक घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांचे घर फोडून चोरट्यांनी तिजोरीतील सोन्याची चेन व ब्रेसलेट असे पाच तोळे दागिने सव्वादोन लाख व रोख एक लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार आहे. याबाबत उत्तम नाईक यांनी फिर्याद दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने गुरुवारी सायंकाळी दागिने असलेला डबा कपाटात सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. चोरीतील एक लाख रुपये रोख रक्कम मिळाली नसल्याने चोरटा हा नाईक यांच्या जवळचा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Five weights of stolen jewelery were found in Miraj